नवी दिल्ली – फरिदाबादच्या सेक्टर २८ रेल्वे स्टेशनवर एका युवतीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची बाब उघड झाली आहे. स्टेशनच्या इमारतीवर चढून ही युवती खाली उडी मारणार होती. ही बाब केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या (सीआयएसएफ) जवानांच्या निदर्शास आली. जवानांनी युवतीला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात यश येत नव्हते. अखेर महत्प्रयासानंतर ती युवतीने जवानांना सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर तिची चौकशी केली असता समोर आले की ती एका खासगी कंपनीत काम करते. तिच्या बॉसने तिला खुप जोरात रागावले. त्याचा तिला खुप राग आला. याच रागाच्या भरात तिने आत्महत्या करण्याचा निश्चय केला. त्यानंतर पुढील सगळा प्रकार घडला. कंपनीत एक सॅम्पल फेल आल्यामुळे ही युवती गेल्या काही दिवसांपासून तणावात होती. त्यामुळेच वरिष्ठ अधिकारी संतप्त झाले आणि त्यांनी दरडावून कर्मचाऱ्यांशी बोलले. दरम्यान, याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत असून युवती व कंपनीच्या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी सुरू आहे.
https://twitter.com/Join_AmitSingh/status/1418976582933352461