औरंगाबाद – राज्य सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती कायदा केला असला तरी महिला सुरक्षेचा प्रश्न कायम असल्याचे दिसून येत आहे. औरंगाबाद येथे भर सकाळी एक घटना घडली आहे. एसबी कॉलेज रोडवर एक विद्यार्थिनी क्लासला जात होती. त्याचवेळी या विद्यार्थिनीच्या पाठीमागून एक बाईकस्वार आला. त्याने या विद्यार्थिनीचा विनयभंग केला. हा सर्व प्रकार एका सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. याप्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. राज्यात महिला असुरक्षितच असून निर्भया पथक कुठे आहे, पोलिस काय करीत आहेत, असा सवाल त्यांनी केला आहे. बघा, या घटनेचा व्हिडिओ
https://twitter.com/ChitraKWagh/status/1476787321085169667?s=20