नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बाहेरील दिल्लीतील सुलतानपुरी पोलीस स्टेशन परिसरात एका तरुणीला कारमध्ये अनेक किलोमीटरपर्यंत फरफटत नेले. त्यामुळे या तरुणीचा दुर्देवी मृत्यू झाल आहे. याप्रकरणी नागरिक रस्त्यावर उरले असून त्यांनी पोलिस स्टेशनला घेराव घातला. दिल्लीनायब राज्चेयपाल विनय कुमार सक्सेना यांना पदावरून तत्काळ बडतर्फ करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
देशाची राजधानी दिल्लीत एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे. कांझावाला भागात शनिवारी रात्री उशिरा स्कूटीवरून जाणाऱ्या मुलीला कारने धडक दिली. या घटनेनंतर तरुणीचा मृतदेह तब्बल १३ किलोमीटरपर्यंत ओढून नेण्याच्या अमानुष घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोमवारी समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच तरुणांना अटक केली आहे. सर्व आरोपी दारूच्या नशेत होते. त्यांनी मद्यपान केल्याचे वैद्यकीय अहवालातही स्पष्ट झाले आहे. बाह्य दिल्लीचे डीसीपी हरेंद्र सिंह यांनी सांगितले की, कारमध्ये बसलेल्या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृताचे पोस्टमॉर्टम डॉक्टरांच्या मंडळामार्फत केले जाणार आहे. दिल्ली पोलिसांनी दिल्ली सरकारला पत्र लिहून याप्रकरणी वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याची विनंती केली आहे.
कांझावाला परिसरात घडलेल्या या वेदनादायक घटनेबाबत नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. सोमवारी संतप्त जमावाने स्थानिक पोलीस ठाण्याला घेराव घातला. घटनास्थळी जमलेल्या लोकांनी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. या प्रकरणातील पाचवा आरोपी मनोज मित्तल हा भाजपचा नेता असल्याचे आपने म्हटले आहे. त्याचे होर्डिंग सुलतानपुरी पोलिस स्टेशनजवळ लावले आहे. ज्या स्थानकात त्याला ठेवले आहे. त्यामुळे या प्रकरणात दडपशाही असल्याचा आरोप ‘आप’ने केला आहे. याशिवाय त्या भागातील डीसीपी आणि एसएचओ यांना अद्याप निलंबित का करण्यात आले नाही, असा सवालही आपने उपस्थित केला आहे. कारमध्ये अडकलेल्या मुलीची माहिती देण्यासाठी प्रत्यक्षदर्शीने २२ वेळा फोन केला, पण पोलिसांनी कारवाई केली नाही, असे आपने म्हटले आहे.
https://twitter.com/AapVijayKr/status/1609824316086161412?s=20&t=Wdw1PryQMqUoY5RFvq20Wg
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी राजघाटावर ५० इलेक्ट्रिक बसचे उद्घाटन करताना सुलतानपुरी घटनेबाबत भाष्य तेले. ते म्हणाले की, तरुणीला कारमध्ये अनेक किलोमीटरपर्यंत ओढून नेल्याप्रकरणी सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. या घटनेने मला खूप दु:ख झाले आहे, या घटनेतील दोषींना फाशी व्हावी यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे ते म्हणाले.
https://twitter.com/AHindinews/status/1609815972575350785?s=20&t=HZ2708QU9PUsZL2ZfNL75w
Young Girl Drag Car in Delhi Protest by Citizens