रविवार, सप्टेंबर 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

सोलर पंपामुळे ऊस शेतीला मिळाली संजीवनी! तरूण शेतकऱ्याच्या प्रयत्नांना यश

by Gautam Sancheti
जुलै 4, 2022 | 5:00 am
in राज्य
0
IMG 20220703 WA0011 e1656854165646

 

शिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – घरची वडिलोपार्जित १५ एकर जमीन…पाण्याची चोवीस तास मुबलकता ; मात्र वीजेच्या अनियमितेमुळे शेती करणे कष्टप्रद… अशातच शासनाच्या मुख्यमंत्री सौर पंप योजनेचा लाभ मिळाला आणि ऊस शेतीला संजीवनी मिळाली असून उसाच्या फडात बसविलेल्या सौर संचामुळे १२ एकर शेती बहरून आली .

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोतुळ येथील उच्च पदवीधारक तरूण शेतकरी शुभम उपासनी यांनी ऑक्टोबर २०२० मध्ये वडिलांच्या नावावर शासनाच्या मुख्यमंत्री सौर पंप योजनेत अर्ज केला. या योजनेत त्यांची निवड होऊन त्यांच्या शेतात ऑक्टोबर २०२१ मध्ये साडेसात अश्व शक्तीचा कृषी सोलर वॉटर पंप बसविण्यात आला. सोलर पंप बसण्यापूर्वी ऊस शेती करतांना कसरत करावी लागत होती. वीजेच्या अनियमितेमुळे उसाला पाणी देतांना तारांबळ होत होती. कधी कधी तांत्रिक कारणांमुळे आठ-दहा दिवस विद्युतपुरवठा खंडित झाल्याने मोठे नुकसान व्हायचे. आता मात्र १२ एकर ऊस शेताला सोलर पंपाद्वारे पाणी देणे सोयीचे, सहज साध्य होत आहे. त्यामुळे उसाची शेती करणे फायद्याचे ठरत आहे. असे शुभम उपासनी यांनी सांगितले.

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेत खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदानावर सोलर पंप दिला जातो. या पंपाची खुल्या बाजारात साधारणत: चार ते साडेचार लाख रूपये किंमत आहे. शुभम उपासनी यांनी यासाठी १० टक्के रक्कमेचा भरणा केला. त्यातून त्यांना सोलर (सौर) संच मिळाला. शक्ती सोलर कंपनीच्या ह्या संचाला साडेसात अश्वशक्तीचा पंप जोडण्यात आला. सध्या सकाळी साडेआठ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत विनाअडथळा हा पंप सुरू आहे. सध्या दिवसाला दीड एकर उसाच्या क्षेत्राचे सिंचन होते. सोलर पंप संच मिळवून देण्यासाठी शुभमला महावितरणचे सहायक अभियंता श्रीकांत सोनवणे, विठ्ठल हारक, बाळू घोडे, संजय गवारी , सचिन पाटील यांची मदत झाली.

शुभम स्वत: उच्च विद्याविभुषीत आहे. बी.टेक (फूड टेक्नोलॉजी) मध्ये केल्यानंतर त्यांनी एम.बी.ए (मॉर्केटिंग) केले आहे. वडिल सतीश उपासनी खासगी अनुदानित संस्थेत लिपिक आहेत. घरी आजोबा, आई, बहिण व पत्नी असा परिवार आहे. घरातील एकुलता एक मुलगा असल्यामुळे संपूर्ण शेतीची जबाबदारी शुभम वर आहे. शेतीच्या कामात वडिल व आजोबांचे त्याला नेहमी मार्गदर्शन मिळत आहे.
शेतीसोबत शेतीपूरक व्यवसाय म्हणून गायींचा गोठा ही शुभमने उभा केला आहे. सध्या त्यांच्याकडे डांगी, जर्सी व गीर गायी आहेत. यातून दूग्ध उत्पादनासोबतच शेणखत उपलब्ध होते. या शेणखताच्या माध्यमातून सेंद्रीय पध्दतीने शेती करणे शक्य होत आहे. भविष्यात पॉली हाऊसच्या माध्यमातून पीक उत्पादन घेण्यावर भर देणार आहे. तसेच सूक्ष्म सिंचन, सेंद्रीय खत व कमीत कमी मनुष्यबळाचा वापर करत आधुनिक पध्दतीने शेती केली तर शेती निश्चितच फायदेशीर ठरेल.असे ही शुभम उपासनी याने सांगितले.

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त सध्या राज्यभर विविध शासकीय उपक्रम राबविले जात आहेत. नाशिक विभागात विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली राज्य शासनाच्या विविध योजना व उपक्रम यांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे.

Young Farmer Success Story Solar Pump Sugarcane Farm

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मालेगावात बस आणि रिक्षाचा अपघात; २ जण जखमी (बघा व्हिडीओ)

Next Post

गुगल असिस्टंट वापरताय? आधी हे वाचा मग ठरवा

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

modi 111
राष्ट्रीय

पंतप्रधानाच्या हस्ते मणिपूरमध्ये १२०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन…

सप्टेंबर 14, 2025
भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटीसंदर्भात विविध क्षेत्रातील तज्ज्ञांसोबत चर्चा1 971x420 1
संमिश्र वार्ता

भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटी संरक्षण उत्पादन उद्योगासाठी सहाय्यभूत ठरेल…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सप्टेंबर 14, 2025
Kia Range 1
संमिश्र वार्ता

किया इंडियाची घोषणा…ग्राहकांना मिळणार १.७५ लाख रूपयांपर्यंत हा फायदा

सप्टेंबर 14, 2025
crime1
क्राईम डायरी

पत्ता विचारण्याचा बहाणा करुन महिलेची अशी केली फसवणूक…पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सप्टेंबर 14, 2025
rain1
महत्त्वाच्या बातम्या

या दोन दिवसात महाराष्ट्रात अतिजोरदार पाऊस…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

सप्टेंबर 14, 2025
IMG 20250913 WA0446
महत्त्वाच्या बातम्या

अपघाती मृत्यू प्रकरणी वारसांना एक कोटींची भरपाई… लोकन्यायालयामध्ये प्रकरण निकाली

सप्टेंबर 14, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींच्या घरामध्ये आनंदी वातावरण असेल, जाणून घ्या, रविवार, १४ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 13, 2025
crime 13
क्राईम डायरी

स्टोव्हच्या भडक्यात गंभीर भाजलेल्या ८५ वर्षीय महिलेचा मृत्यू

सप्टेंबर 13, 2025
Next Post
google assistant

गुगल असिस्टंट वापरताय? आधी हे वाचा मग ठरवा

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011