मुंबई – वरील फोटोमध्ये दिसणाऱ्या अभिनेत्रीला तुम्ही चांगलेच ओळखता. तिच्या फिटनेसबाबत आणि चित्रपट पाहण्यासाठी चाहते नेहमीच तत्पर असतात. तरीही तुम्ही नाही ओळखलंत? चला आणखी थोडी हिंट देतो. ही अभिनेत्री चित्रपटसृष्टीतील कुटुंबाशी संबंधित आहे. अजूनही तुम्ही ओळखू शकला नाहीत? चला आम्हीच सांगतो…
ही आहे चित्रपट अभिनेत्री सारा अली खान. होय ही सारा अली खानच आहे. साराचे ९६ किलो वजन असतानाचा हा फोटो आहे. ती पीसीओडी नावाच्या आजाराने ग्रस्त होती. साराने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा फोटो #Throwback हॅशटॅगसोबत शेअर केला आहे.
चार महिन्यात ३० किलो वजन घटविले
लहानपणी सारा एक क्यूट आणि गुबगुबीत मुलगी होती. परंतु बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यापूर्वी तिने स्वतःला फॅटकडून फिट केले. त्यासाठी साराने चार महिने खूपच मेहनत घेतली. योग्य डाएट घेऊन तिने आपले वजन ३० किलो कमी करण्यात यश मिळविले.
आई अमृतासुद्धा आश्चर्यचकित
वजन कमी करण्याच्या साराचा समर्पण भाव पाहून तिची आई अमृता सिंहसुद्धा आश्चर्यचकित झाली. सारा महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान घराबाहेर होती. पूर्ण निष्ठेने तिने वजन कमी करण्याचा प्रयत्न केला. सारा परदेशातून शिक्षण घेऊन परतल्यानंतर अमृता सिंह तिच्या स्वागतासाठी विमानतळावर पोहोचली. परंतु बदलेल्या लूकमुळे अमृता सिंह साराला ओळखूच शकली नाही.
वजन वाढण्याची कारणे
सारा अलीने एका मुलाखतीत सांगितले की, लहानपणी पीसीओडीमुळे ती स्थूल झाली होती. खाण्या-पिण्याची तिला आवडही होती. त्यामुळे तिचे वजन वाढत गेले. पॉलिसिस्टिक ओवेरियन सिंड्रोम (सीसीओडी) आजारामुळे हार्मोन बॅलेन्स बिघडते. अनेक लहान मुलींमध्ये हा आजार पाहायला मिळतो. साराशी या आजाराशी लढा अजूनही सुरू आहे. व्यायाम आणि योग्य आहार घेतल्यामुळे ती बहुतांश बरी झाली आहे.