विशेष प्रतिनिधी, मुंबई
इन्स्टंट मेसेजिंगसाठी व्हाट्सऍप हे अत्यंत लोकप्रिय ऍप आहे. पण जर तुम्हाला एखाद्याने इथे ब्लॉक केलं असेल तर? डोन्ट वरी, त्यासाठीच आम्ही घेऊन आलो आहोत एक खास ट्रीक. ज्यामुळे ब्लॉक केलं असलं तरीही तुम्ही त्या व्यक्तीशी बोलू शकता.
यासाठी तुम्हाला तुमच्या दोघांच्याही ओळखीत असलेल्या एका कॉमन फ्रेंडची किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याची गरज लागेल. म्हणजे असं की या कॉमन फ्रेंडने तुम्हा दोघांना घेऊन व्हाट्सऍपवर एक ग्रुप तयार करायचा. आणि मग त्याने त्यातून बाहेर पडायचं. म्हणजे मग त्याने ब्लॉक केलंय तो आणि तुम्ही परस्परांशी बोलू शकता.
लवकरच येणार हे फीचर
व्हाट्सऍपचे disappearing message फीचर तर सगळ्यांना माहीत आहेच. हे फीचर ऑन केलं की सात दिवसांनंतर ते मेसेज डिलीट होतात. हेच फीचर अपग्रेड होणार असून त्यानंतर हा आठवड्याभराचा कालावधी एका दिवसावर येणार आहे.
वेब बीटा इन्फोने दिलेल्या माहितीनुसार, व्हाट्सऍप सध्या या फिचरवर काम करत असून यातील सात दिवसांसोबतच 24 तासांचाही पर्याय दिला जाणार आहे. हे ऍक्टिव्हेट केले की मेसेज 24 तासांनी डिलीट होतील. सध्या याचे टेस्टिंग सुरू आहे.