शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

‘बटेंगे तो कटेंगे’ची प्रेरणा शिवाजी महाराजांपासून….योगी आदित्यनाथ यांचे मत; उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर

by India Darpan
नोव्हेंबर 7, 2024 | 1:41 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
yogi adityanath

वाशिम (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केली आहे. ‘ही महाआघाडी नव्हे, तर महाअनाडी आहे,’ असे सांगून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

ते म्हणाले, की मोदींच्या नेतृत्वात भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महायुती लढत आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या रूपाने ‘महाअनाडी’ निवडणूक लढवत आहेत. त्यांना देश आणि धर्माची चिंता नाही. राष्ट्रीयत्वाची चिंता नाही. समाजामध्ये मूल्य आदर्शाच्या मर्यादेची चिंता नाही, असे हे महाअनाडी गठबंधन आहे. शिवाजी महाराजांचा संघर्ष असो की संभाजी महाराजांचा संघर्ष आपल्याला नवी प्रेरणा देतो. शिवाजी महाराजांनी आपल्या सगळ्यांना एकत्र आणले होते. प्रत्येक भारतवासीयाला आपल्या सेनेचा हिस्सा बनवले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी एकतेचे प्रदर्शन करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती. त्यावरूनच प्रेरणा घेऊन मी वारंवार सांगतो. ‘बटिये मत. क्युकी जब भी बटे थे तब कटे थे, एक है तो नेक है, एक है तो सेफ है, हमे बटना नही है, एकजुट होना है!

योगी आदित्यनाथ यांनी औरंगाबादचे नामकरण संभाजीनगरच व्हायला पाहिजे, हे सांगत असताना अफजल खान आणि औरंगजेब यांच्यात गफलत केली. ते म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या अफजलखानाला मारले, त्याच्या नावावरून औरंगाबाद नाव असणे हे हटवायलाच पाहिजे. संभाजीनगरच्या रूपाने त्याला ओळख मिळाली पाहिजे. शिवाजी महाराजांचा संघर्ष असो की संभाजी महाराजांचा; आम्हाला प्रेरणा आणि आदर्श देतो.

योगी आदित्यनाथ यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेचा नारळ वाशिममधून फोडला; मात्र या सभेला अल्प प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले. कारंजा विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार सई डहाके आणि रिसोड विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेना (शिंदे) पक्षाच्या उमेदवार भावना गवळी या सभेला अनुपस्थित होत्या. त्यामुळे या तिघांना आमंत्रणच नव्हते का, अशा चर्चांना उधाण आले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कार्तिकी एकादशीला आठ लाख भाविक येणार…विठ्ठल मंदिर समितीचा अंदाज

Next Post

संघाकडून महापुरुषांच्या विचारांवर हल्ला…राहुल गांधी यांची टीका

Next Post
Rahul Gandhi

संघाकडून महापुरुषांच्या विचारांवर हल्ला…राहुल गांधी यांची टीका

ताज्या बातम्या

rohit pawar

राज्य शासनाने १५ दिवसांच्या जाहिरातीसाठी १० कोटी ६० लाख खर्च करण्याचा घेतला निर्णय…रोहित पवार यांची टीका

जून 20, 2025
vidhanbhavan

विधानभवनमध्ये २३ व २४ जून रोजी ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद…हे मान्यवर राहणार उपस्थित

जून 20, 2025
परीक्षा भवन 3

मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक

जून 20, 2025
cbi

सीबीआयने बनावट नोटा प्रकरणातील या आरोपीला इंटरपोल चॅनेलद्वारे युएईहून परत आणले…

जून 20, 2025
Governor releases book 01 51 1024x615 1

रा. स्व. संघ ही सर्वसमावेशक संघटना…राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

जून 20, 2025
cm dharangaon 1024x684 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धरणगावमध्ये ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011