इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
कोल्हापूरः ही निवडणूक केवळ सत्तेसाठी नाही, तर महाराष्ट्र आणि देशासाठी महत्वाची आहे. एकीकडे महायुती आहे आणि दुसरीकडे कोणतीही नीती आणि नैतिकता नसलेली आघाडी आहे. महाविकास आघाडीत नुरा कुस्ती चालू आहे. पवार आणि ठाकरेंमध्ये नुरा कुस्ती सुरू असून ते स्वत:ला आणि देशाला धोका देतील, अशी टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली.
आदित्यनाथ यांची कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा पार पडली. कोल्हापुरातील तपोवन मैदानात सभा झाली. या वेळी बोलताना योगी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, की काँग्रेसचा इतिहासच देशाला धोका देण्याचा आहे. काँग्रेस नसता तर हा देश कधी तुटला नसता, देश तुटला नसता तर आज पाकिस्तान नसता. काँग्रेसच्या गुदगुल्याने आज पाकिस्तान आहे. ते म्हणाले, की काल प्रियंका आल्या होत्या. त्या विकासावर काही बोलले नसणार, त्या केवळ तोडण्याची भाषा करण्यासाठी आल्या होत्या.
मल्लिकार्जुन खर्गे यांचे घर निजामाने जाळले होते. यात खर्गे यांचे कुटुंब जले. मी ‘बटेंगे तो कंटेंगे’ म्हटल्यावर खर्गे यांना राग येतो. खर्गे लोकांना खरा इतिहास सांगा निजाम कोण होता असे आव्हान देऊन योगी म्हणाले, की बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी कधी काँग्रेस बरोबर आघाडी केली असती का? पण उद्धव यांनी बाळासाहेब यांच्या मूल्यांना बाजूला करून काँग्रेसबरोबर आघाडी केली. महायुती सरकार आले, की विशाळगड अतिक्रमण आपोआप निघते. आपल्या गणेश मिरवणुकीवर कोण दगडफेक करणार नाही. त्यांना माहीत आहे जर दगडफेक केली तर उत्तर प्रदेशचा फॉर्म्युला येथे लागू होईल.
काँग्रेसला कधी देश महत्त्वाचा वाटला नाही. काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात दहशतवाद वाढला होता. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर कुणी देशाकडे वाकड्या नजरेने पाहत नाहीत. हा नवीन भारत आहे. कुणी छेडले, तर सोडत नाही. ‘हम बटे थे तब अपमान सहन करना पडता था!’ अशी टीका योगी यांनी केली.