नवी दिल्ली – देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने केंद्र सरकार व राज्य शासनाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहे. परंतु नागरिकांनी देखील आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. कारण औषधोपचार, लसीकरण, मास्कचा वापर, स्वच्छता आदी उपाययोजना करत असताना सरकारने कर्मचारी आणि नागरिकांना प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून योगा करण्याचे आव्हान केले आहे.
कोरोना संसर्गाची झपाट्याने वाढणारी घटना लक्षात घेता या संदर्भात गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयानेही अधिकारी व कर्मचार्यांना विशेष योगा करण्याचा सल्ला दिला आहे. सदर योग क्रियेचे वर्णन सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी केले असून त्याचा व्हिडिओ लिंक द्वारे सामायिक केला गेला आहे.
गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयाने एका कार्यालयीन निवेदनाद्वारे सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्या सिंह योग कृतीचा अवलंब करावा आणि त्यांची प्रतिकारशक्ती व श्वासोच्छ्वास व्यवस्था बळकट करावी अशी सूचना आपल्या सर्व अधिकारी व कर्मचार्यांना केली आहे.
योग क्रियेकडे एक सकारात्मक उपाय म्हणून घेतले पाहिजे. तसेच या निवेदनात म्हटले आहे की, यापूर्वी हा व्हिडिओ मंत्रालयाच्या सचिवांनी अधिकारी व कर्मचार्यांसह सामायिक केला होता. सदर योगा हा सकाळी रिकाम्या पोटी केला जातो आणि त्याद्वारे श्वासोच्छवासाची प्रणालीत सुधारणा होऊन आणि रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. योगा करण्याचा सर्व स्तरांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही सल्ला देण्यात आला आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!