शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

१६९ देशांमधील ७,५२,०७४ लोकांनी एकत्र योग करत रचला विक्रम…

by India Darpan
जून 21, 2025 | 1:30 pm
in संमिश्र वार्ता
0
World Record e1750492811590

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- आंतरराष्‍ट्रीय योग दिन साजरा करत हॅबिल्‍ड या भारतातील पहिल्‍या हॅबिट-बिल्डिंग प्‍लॅटफॉर्मने उल्‍लेखनीय जागतिक टप्‍पा गाठला आहे, जेथे ‘जागतिक स्‍तरावर ऑनलाइन योग क्‍लासमध्‍ये सर्वाधिक उपस्थिती’ शीर्षकासाठी नवीन जागतिक विक्रम रचला आहे. २१ जून रोजी सकाळी अधिकृत वर्ल्ड रेकॉर्डच्या अध्यक्षतेखाली हॅबिल्डचे सौरभ बोथरा यांनी आयोजित केलेल्या समक्रमित, मार्गदर्शित सत्रात १६९ देशांमधील ७,५२,०७४ पेक्षा जास्त सहभागी व्हर्च्युअल पद्धतीने योगा करण्यासाठी एकत्र आले.

नागपूरहून लाइव्‍ह स्ट्रिमिंग करण्‍यासह जगभरात उपलब्‍ध करून देण्‍यात आलेल्‍या या ४५ मिनिटांच्या सत्रात १०० हून अधिक देशांतील योगसाधक एकत्र आले, ज्यामुळे हा सर्वात सर्वसमावेशक व दूरगामी योग इव्‍हेण्‍ट ठरला.

हा हॅबिल्डचा आतापर्यंतचा पाचवा जागतिक विक्रम आहे. जानेवारी २०२४ मध्ये २,४६,२५२ प्रेक्षकांसह यूट्यूबवर योग लाइव्ह स्ट्रिमिंगसाठी सर्वाधिक दर्शकांचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित झाला, त्यानंतर ५,९९,१६२ प्रेक्षकांसह योग धड्यासाठी एकाच दिवसात सर्वाधिक लाइव्ह दर्शकांचा वर्ल्ड रेकॉर्ड युनियनचा किताब आणि २,८७,७११ सहभागींसह व्हर्च्युअल ध्यान वर्गात सर्वाधिक उपस्थिती असा वर्ल्ड रेकॉर्ड युनियनचा किताब मिळवला. २०२३ मध्ये, हॅबिल्डने वर्ल्ड रेकॉर्ड युनियनच्या व्हर्च्युअल योग वर्गात सर्वात जास्त उपस्थितींची नोंद केली होती, ज्यामध्ये १,३४,०५७ सहभागी उपस्थित होते.

या योग सत्रासह हॅबिल्डच्या २१ दिवसांच्या #हरघरयोग्य उपक्रमाचे समापन झाले, ज्‍याने सहभागींना मोफत, मार्गदर्शन सत्रांद्वारे दररोज योग यांसारखे व्‍यायाम करण्‍यास प्रेरित केले. या उपक्रमामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्याला चालना मिळण्‍यासोबत विविध वयोगटातील व्‍यक्‍तींमध्‍ये, भौगोलिक क्षेत्रांमध्‍ये आणि अनुभवी व्‍यक्‍तींमध्‍ये सामुदायिक भावना देखील जागृत झाली.

या उपलब्‍धीबाबत मत व्‍यक्‍त करत हॅबिल्‍डचे सह-संस्‍थापक आणि प्रमाणित योग प्रशिक्षक सौरभ बोथरा म्‍हणाले, “या विक्रमामधून सहयोगात्‍मक उद्देशाची क्षमता दिसून येते. जगभरातील लोक योगाद्वारे स्वतःला सिद्ध करण्यासारखी लहान सवय अंगिकारतात तेव्हा त्याचा परिणाम परिवर्तनशील असतो. या मोहिमेवर विश्‍वास ठेवणाऱ्या आणि #हरघरयोग जागतिक चळवळ बनवणाऱ्या प्रत्येक सहभागीचे आम्ही आभारी आहोत.”

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

जेएनपीएचे माजी मुख्य व्यवस्थापकासह या संस्थेविरुध्द सीबीआयने दाखल केला गुन्हा…८०० कोटीचे प्रकरण

Next Post

अहमदाबाद विमान अपघात…एअर इंडियाच्या ३ अधिका-यांची हकालपट्टी

Next Post
AIR INDIA

अहमदाबाद विमान अपघात…एअर इंडियाच्या ३ अधिका-यांची हकालपट्टी

ताज्या बातम्या

IMG 20250621 WA0179 1

मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून कलाग्रामच्या कामाची पाहणी….

जून 21, 2025
AIR INDIA

अहमदाबाद विमान अपघात…एअर इंडियाच्या ३ अधिका-यांची हकालपट्टी

जून 21, 2025
World Record e1750492811590

१६९ देशांमधील ७,५२,०७४ लोकांनी एकत्र योग करत रचला विक्रम…

जून 21, 2025
cbi

जेएनपीएचे माजी मुख्य व्यवस्थापकासह या संस्थेविरुध्द सीबीआयने दाखल केला गुन्हा…८०० कोटीचे प्रकरण

जून 21, 2025
WhatsApp Image 2025 06 21 at 12.10.37 AM 1024x681 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन

जून 21, 2025
IMG 20250621 WA0030 1

नाशिक येथे या तारखेला कथक जुगलनृत्य आणि शास्त्रीय गायनाची मैफिल…

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011