नाशिक – गोविंदनगर येथील संध्या छाया ज्येष्ठ नागरिक संघाने मंगळवारी, २१ जून रोजी योग प्रशिक्षण शिबीर आयोजित केले आहे.
जागतिक योग दिनाच्या निमित्ताने मंगळवारी, २१ जून रोजी सायंकाळी पाच वाजता योग प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. गोविंदनगरच्या सद्गुरूनगर येथे संध्या छाया ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रातील या कार्यक्रमात स्मिता दंडगव्हाळ या मार्गदर्शन करणार असून, प्रशिक्षणही देणार आहेत. या शिबिरात परिसरातील नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विठ्ठल देवरे, सचिव मनोहर पाटील, एस. के. देवरे, शोभाताई सावकार, राधाकृष्ण जाधव, बापुराव पाटील, हिरालाल ठाकूर, दिलीप खोडके, गुलाबराव शिंदे, सुजाता येवलेकर यांच्यासह पदाधिकार्यांनी केले आहे.