मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – योगगुरू बाबा रामदेव आज, १६ सप्टेंबरला मोठा धमाका करणार आहे. दुपारच्या सुमारास त्यांची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत ते पतंजली समूहाच्या ५ कंपन्यांच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) योजनेची तपशीलवार माहिती देणार आहेत. योगगुरू रामदेव यांनी अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले होते की, पतंजली आयुर्वेद, पतंजली वेलनेस आणि पतंजली मेडिसिन याशिवाय पतंजली लाइफस्टाइलचा आयपीओ लॉन्च करण्याची योजना आहे. रामदेव यांच्या योजनेनुसार या कंपन्या पुढील ५ वर्षात शेअर बाजारात सूचिबद्ध होतील.
बाबा रामदेव हे पतंजली आयुर्वेद कंपनीचे संस्थापक आहेत. बाबा रामदेव यांनी १९९५ मध्ये दिव्य योग मंदिर ट्रस्टची स्थापना केली. २००३ मध्ये आस्था टीव्ही या धार्मिक वाहिनीने बाबा रामदेव यांचे योग दाखवण्यास सुरुवात केली, त्यामुळे त्यांच्या अनुयायांची संख्या वाढू लागली. योगगुरू बाबा रामदेव यांनी २००६ मध्ये पतंजली योगपीठाची स्थापना केली होती. जिथे आयुर्वेदिक उपचार केले जातात. बाबा रामदेव यांची कंपनी पतंजली आयुर्वेद भारतीय ग्राहकोपयोगी वस्तूंच्या बाजारपेठेत झपाट्याने प्रवेश करत आहे. कंपनीच्या अधिकृत आकडेवारीनुसार २०१६ ते १७ मध्ये पतंजली आयुर्वेदची विक्री सुमारे १० हजार कोटी रुपये होती.
योगगुरू रामदेव यांच्या किमान 5 कंपन्यांचे आयपीओ (IPO) येण्याच्या तयारीत आहेत. याद्वारे कंपन्या शेअर बाजारात सूचिबद्ध होतील. खुद्द बाबा रामदेव यांनीच यासंदर्भातील महत्त्वाची माहिती दिली आहे. एका मुलाखतीत योगगुरू रामदेव यांनी सांगितले की ज्या कंपन्यांचा आयपीओ लाँच होणार आहे ,त्यामध्ये पतंजली आयुर्वेद, पतंजली वेलनेस आणि पतंजली मेडिसीन याशिवाय पतंजली लाइफस्टाइल यांचा समावेश आहे.
या कंपन्या पुढील ५ वर्षात शेअर बाजारात सूचिबद्ध होतील.बाबा रामदेव यांच्या नेतृत्वाखालील पतंजली आयुर्वेदने २०१९ मध्ये रुची सोयाला एका ठराव प्रक्रियेचा भाग म्हणून ४३५० कोटी रुपयांना विकत घेतले होते. ही कंपनी आधीच स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट झाली होती. त्याच वर्षी कंपनीचे नाव बदलून पतंजली फूड्स करण्यात आले आहे.
पतंजली फूड्सच्या शेअर्सची खरेदी सुरूच आहे. यामुळे शेअरचा भाव ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. या शेअरची किंमत १३८०.३५ रुपये होती. व्यवहारादरम्यान शेअरची किंमत १४०० रुपयांपर्यंत गेली होती. त्याच वेळी मार्केट कॅपने ५० हजार कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला होता. तसेच विश्लेषकांनी सांगितले होते की शेअरची किंमत १७२५ रुपयांपर्यंत जाऊ शकते. सध्याच्या दृष्टीनं पाहता गुंतवणूकदारांना ३०० रुपयांपेक्षा अधिक नफा मिळण्याची शक्यता आहे.
सध्या पतंजली फूड्स स्टॉक मार्केटमध्ये चांगली कामगिरी करत आहे. गेल्या एका महिन्यात शेअर्सच्या किमतीत १२.८९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या सहा महिन्यांत त्याची किंमत ५३.६६ टक्क्यांनी वाढली आहे. दोन वर्षांत १०५ टक्के परतावा दिला आहे. आता गेल्या पाच वर्षांतील यातून मिळणारा परतावा पाहता पतंजली फूड्सच्या समभागांनी त्यांच्या गुंतवणूकदारांना ५४०० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.
विशेष म्हणजे सप्टेंबर २०१७ मध्ये त्याच्या शेअरची किंमत सुमारे २६ रुपये होती. सप्टेंबर २०२० पर्यंतच्या तीन वर्षांत या शेअरची किंमत ६१३ रुपयांपर्यंत वाढली आहे. त्याच वेळी, शुक्रवारी, त्याच्या समभागांनी १३९८ या ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला. पतंजली फूड्स ही खाद्यतेलाचे उत्पादन करणारी देशातील आघाडीची कंपनी आहे. तसेच बाबा रामदेव यांच्या कंपनीच्या शेअर्समध्ये झालेली वाढ पाहून रिसर्च फर्म्सही या खरेदीला फायदेशीर करार असल्याचे सांगत आहेत.
Yog guru Baba Ramdev Big Announcement Today
Patanjali Industry IPO