येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील खिर्डीसाठे येथील तरुण शेतकरी योगेश इप्पर यांची यशोगाथा अनेकांना प्रेरणा देणारी आहे. या शेतक-याने आपल्या शेतात वेगवेगळे प्रयोग केले आहेत. आता या शेतकऱ्याने ७० गुंठ्यात गोल्डन जातीच्या ६०० सीताफळ झाडांची लागवड केली आहे. १२ बाय १५ अंतरावर केलेली ही लागवड खुपच यशस्वी झाली आहे.
योग्य व्यवस्थापन तसेच प्रत्येक फळाची ग्रेडिंग या शेतकऱ्याने केली. त्यामुळे बाहेरील व्यापा-यांच्या पसंतीस हे सिताफळ उतरले आहेत. परिणामी, येथील सीताफळ थेट बांगलादेशात निर्यात होत आहेत. आतापर्यंत शेतकऱ्याला तब्बल तीन लाख रुपयांचा नफाही झाला आहे. यापुढे आणखीन एवढेच उत्पन्न मिळण्याची अपेक्षा योगेश इप्पर यांना आहे.
बघा त्यांचा हा व्हिडिओ
Yeola Sitaphal Custard Apple Agriculture Farming Fruits Export
Young Farmer Yogesh Ippar Success Story Nashik District