येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्हयात सलग दुस-या दिवशी वेदांतच्या फॉक्सकॉन प्रकरणी युवासेना-शिवसैनिकांकडून निषेध आंदोलन करण्यात आले. येवला येथील तहसिल कार्यालयावर युवा सेनेचे कुणाल दराडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात करण्यात आले. या आंदोलना वृध्द सुध्दा सामिल झाले. पाण्यात हंडा व्हिसळला एकनाथ शिंदे पिसाळला, ५० खोके एकदम ओके अशा घोषणा देत हातात रिकामे खोके घेऊन तहसिलवर काढलेल्या या निषेध आंदोलनाची चांगली चर्चा मात्र या निमित्ताने झाली.