येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मतदारसंघात विकास हवा असेल तर भुजबळ तुमच्या समोर आहे. मतदारसंघातील तसेच राज्यातील माझ्या लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी कुणाचीही मदत मागायला तयार आहे. माझ्याकडे कुठलाही अभिन्वेष नाही. विकासाला कुठलीही जात धर्म भाषा जात नाही. त्यामुळे जनतेच्या विकासासाठी आपण सर्व काही करू शकतो असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष तथा माजी खासदार समीर भुजबळ, आमदार दिलीप बनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विंचुर चौफुली येथे पिंपळस ते येवला ५६० कोटी व चांदवड हद्द – लासलगाव ते विंचुर चौपदरी रस्ता रामा क्र. ७ किमी १८९/४०० ते १९९/००० आणि म्हसोबा माथा धारणगांव सारोळे ते खेडलेझुंगे १३४ कोटी या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन आज करण्यात आले. या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी आमदार दिलीप बनकर, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, अरुण थोरात, विश्वास आहेर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, राधाकिसन सोनवणे, मायावती पगारे, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, जलचिंतन सेलचे अध्यक्ष डॉ.मोहन शेलार, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब भवर, साहेबराव मढवई, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, माजी नगराध्यक्ष हुसेन शेख, दत्ता निकम, शहराध्यक्ष दिपक लोणारी, बाजार समितीचे संचालक ज्ञानेश्वर जगताप, किसनराव धनगे, डॉ.श्रीकांत आवारे, गणेश डोमाडे, तानाजी आंधळे, सुवर्णाताई जगताप, बाळासाहेब गुंड, माजी सभापती प्रकाश वाघ, शिवाजी सुपनर, नवनाथ काळे, एल.जी.कदम, महिला अध्यक्ष सुरेखा नागरे, राजश्री पहिलवान, पूजा आहेर, सरपंच सचिन दरेकर, अफजल शेख, बाळासाहेब पुंड, तुकाराम गांगुर्डे, कुमार चव्हाण, प्रा.ज्ञानेश्वर दराडे, मंगेश गवळी, सचिन कळमकर, विनोद जोशी, भाऊसाहेब बोचरे, शेखर होळकर, कैलास सोनवणे, शरद भडांगे, महेश पठाडे, दत्तात्रय डुकरे, विजय सदाफळ, उत्तमराव नागरे, रामभाऊ जगताप, संजय घायाळ, रामनाथ शेजवळ, विलास गोरे, अशोक नागरे, दत्तात्रय रायते, मधुकर गायकर, मकरंद सोनवणे, पांडुरंग राऊत, नितीन गायकवाड, प्रदीप तीपायाले, समाधान पगारे, दत्ता पाटील, बबन शिंदे, जयंत साळी, दिपक गायकवाड, भगवान ठोंबरे, सोहेल मोमीन, अविनाश सालगुडे, नारायण पालवे, अशोक होळकर, डॉ.प्रवीण बुल्हे,उत्तम शिंदे,अल्केश कासलीवाल, चंदू लांडबले, संतोष राजोळे, सुमित थोरात, प्रकाश घोटेकर, गोरख शिंदे, तानाजी कांबळे, इस्माईल मोमीन,मेघा दराडे, माधव जगताप, शीतल शिंदे, सीमा दरेकर, राहुल डुंबरे, डॉ.वैशाली पाटील, ज्ञानेश्वर पाटील, मुख्यअभियंता प्रशांत औटी, अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, कार्यकारी अभियंता उदय पालवे, उपअभियंता अविनाश देवरे, प्रांत अधिकारी हेमांगी पाटील, तहसीलदार विशाल नाईकवाडी, गटविकास अधिकारी महेश पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, ५६० कोटी रुपये खर्च करून पिंपळस ते येवला रस्ता मंजूर केला या रस्त्यासाठी गेली चार वर्ष आपला सातत्याने पाठपुरावा सुरू होता. त्याचप्रमाणे लासलगाव येथे आशिया खंडातील सर्वात मोठं कांद्याचे मार्केट आहे. लासलगाव विंचूर रस्त्यावर अपघाताचे प्रमाण अधिक होते यासाठी १३४ कोटी रुपये लासलगाव विंचूर खेडलेझुंगे रस्ता मंजूर करण्यात आला आहे. यासोबतच हजारो कोटी रुपये खर्च करून मुंबई नाशिक, नाशिक त्र्यंबकेश्वर यासह अनेक रस्त्यांची कामे करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, राज्यात ज्या मतदारसंघामध्ये ADB मधून रस्त्यांचे काम दिले त्या मतदारसंघात HAM/ महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्यात कुठेही काम दिले नाही. मात्र येवला मतदारसंघात दोन्ही प्रकारचे रस्ते मंजूर करण्यात आली आहे. येवला मतदारसंघ हा फक्त अपवाद आहे. या येवला लासलगाव मतदारसंघात दोन हजार कोटी रुपयांची विकासकामे मतदारसंघात सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.ते म्हणाले की, मतदारसंघातील जनता ही विकासासाठी आपल्याला निवडून देते. त्यामुळे आपण सरकारमध्ये सामील झालो. सरकारमध्ये सामील झाल्याने आज दोन हजार कोटी हून अधिक रुपयांची विकासकामे मतदारसंघात झाली आहे. या मतदारसंघात विकासासाठी आपल्याला येवल्यातील जनतेने मला इथे आणलं. या मतदारसंघात हजारो कोटी रुपयांची विकासकामे केली असून विकास हीच आपली जात आणि विकास हाच आपला धर्म आहे. कुठल्याही विशिष्ट जातीसाठी नाही तर सर्व समाजासाठी आपण कामे केली आहे.
ते म्हणाले की, रुई फाटा ते खेडलेझुंगे ६ किमी रस्ता. या रस्त्याचे सुद्धा काम आपण CMGSY टप्पा ३ मधून करतो आहोत. या १० कोटी किमतीच्या रस्त्याच्या कामाला लवकरच प्रमा मिळणार आहे. हा ५.५ मिटर आणि कॉंक्रीट रस्ता आपण करणार आहोत. रुईफाटा ते धारणगाव हा २ किमी चा रस्ता सुद्धा आपण आगामी अर्थसंकल्पातून कॉंक्रीटचा करू असे त्यांनी उपस्थितांना आश्र्वासित केले. ते म्हणाले की, येवला शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण शिवसृष्टी प्रकल्पाचे काम करत आहोत. पाच एकर जागेत सुमारे २१ कोटी रुपये खर्च करून हा भव्यदिव्य प्रकल्प साकार होत आहे. या प्रकल्पाचे दि.२६ सप्टेंबर रोजी लोकार्पण करण्यात येणार आहे. तर दि.२२ सप्टेंबर रोजी या पुतळ्याचे आगमन होणार असून या पुतळ्याचे जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे. या मध्ये मतदारसंघातील नागरिकांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.
ते म्हणाले की, मतदारसंघात आल्यानंतर आपण पुणेगाव डोंगरगाव कालव्याच्या कामावर अभ्यास करून या कालव्याला शाश्वत पाणी मिळण्यासाठी मांजरपाडा प्रकल्प साकारला. वळण बंधारे आणि बोगद्याच्या माध्यमातून हे पाणी पुणेगाव धरणात आणलं. हे पाणी येवल्यातील डोंगरगाव येथे पोहचविण्यासाठी १६० किलोमिटर कालव्याचे अस्तरीकरण करण्यास मंजुरी मिळविली. या कालव्याचे काम दीड वर्षाचे आहे. आपण सहा महिन्यात ८० टक्के काम पूर्ण केले असून डोंगरगाव सह येवला व चांदवड तालुक्यातील अनेक बंधारे भरण्यात आले असून शेतकरयांना त्याचा मोठा फायदा झाला आहे. या प्रकल्पात अधिक पाणी आणण्यासाठी आपण अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या असून त्याचा अभ्यास सुरू झाला आहे. लवकरच मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी दुप्पट होईल असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, लासलगाव विंचूरसह सोळा गाव पाणी पुरवठा योजनेचे नूतनीकरण करण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी अधिक १० कोटी रुपये मंजूर करण्यासाठी आपला पाठपुरावा सुरू असून या परिसरातील नागरिकांचा पिण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. त्याच प्रमाणे धुळगावसह १६ गावे, राजापुरसह ४१ गावे पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू असून योजना पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, मतदारसंघात आपण कोट्यावधी रुपयांची कामे करतो आहोत. मात्र ही विकासाची कामे करतांना विरोधक अनेक अडथळे निर्माण करत असल्याची टीका त्यांनी केली. कांद्याच्या प्रश्नावर सरकारने विशेष लक्ष देऊन कांदा निर्यात मूल्य हटविले आहे. त्यामुळे कांदा शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, लासलगाव उपजिल्हा रुग्णालयासाठी साडे तेरा कोटी रुपये रक्कम मंजूर करण्यात आले आहे. तसेच लासलगाव शिवनदी तसेच विंचूर लोनगंगा स्वच्छता करण्यासाठी २७ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच लासलगाव बाह्य वळण रस्त्यासाठी निधी मंजूर करण्यात आला असून मार्च पर्यंत हे काम पूर्ण केले जाईल असे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार दिलीप बनकर म्हणाले की, विकास म्हणून आपल्याला निवडणुकांना सामोरे जायचे आहे. नाशिक जिल्ह्यात मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांची कामे झाली. राज्यातही विकासाची कामे करण्यासाठी आपल्याला त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायचे आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी तालुकाध्यक्ष भाऊसाहेब भवर, डॉ.श्रीकांत आवारे, सुवर्णाताई जगताप, यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर प्रा. कोथमिरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.