सुयश सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील अंदरसुल गावातील शेतकऱ्यांनी आपल्या ट्रॅक्टरला स्वच्छ धुवून त्याला सजवत गावातील मारुती मंदिरा पर्यंत मिरवणूक काढत आगळ्या वेगळ्या पद्धतीने पोळा सणाचा उत्सव साजरा केला. भारत देश हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो, पूर्वी देशात बैलांच्या माध्यमातून शेतीची काम शेतकरी करीत असे, त्यामुळे देशात बैलांच्या प्रती कृतघ्नता म्हणून एक दिवस बैल पोळ्याचा सण साजरा केला जातो. मात्र आजच्या यांत्रिकी युगात बैलांच्या माध्यमातून शेती करताना वेळ खर्च होत असल्याने सध्या परिस्थितीला अनेक शेतकरी यांत्रिकी युगाचा आधार घेता. कमी वेळेत कमी खर्चात शेतीची काम होत आहे. असे असले तरी प्रत्येक शेतकऱ्याकडे ती साधन उपलब्ध नसली तरी तो पारंपरिक पद्धतीने का होईना बैलांच्या माध्यमातून शेतीची काम करीत असतो. ज्या शेतकाऱ्यांकडे बैल जोडी नाही अशा शेतकऱ्यांनी आज ट्रॅक्टरची मिरवणूक काढत पोळा साजरा केला.