नाशिक – राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून पुरवणी अर्थसंकल्पात येवला मतदारसंघातील सार्वजनिक बांधकाम विभागातील ३ रस्त्यांसाठी व एका पुलाच्या बांधकामासाठी प्रशाकीय मान्यता देण्यात आली असून यासाठी २० कोटी ३० लक्ष रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
हिवाळी अधिवेशनातील पुरवणी अर्थसंकल्पात येवला मतदारसंघातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत असलेल्या तीन प्रमुख रस्ते व एका पुलाच्या कामांसाठी २० कोटी ३० लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये येवला, नागडे, धामणगाव, भारम, वाघाळे ते ७५२ जी रस्ता राज्य महामार्ग ४१२ किमी १/६०० ते ७/२०० व ७/८०० ते ९/७०० मध्ये मजबुतीकरण करण्यासाठी ४ कोटी, नाशिक निफाड, येवला, वैजापूर, औरंगाबाद, प्रमुख राज्य मार्ग २ सा.क्र.१९८/८०० ते १९९/५०० मधील विंचूर गावातून जाणाऱ्या लांबीचे कॉंक्रीटीकरण करण्यासाठी ६ कोटी, वापी,पेठ,नाशिक,निफाड, येवला, वैजापूर औरंगाबाद, जालना प्रमुख राज्य मार्ग २ सा.क्र. २११/५०० ते २१२/००,२१४/०० ते २९५/००,२१६/४२५ ते २१८/०० या रस्त्याच्या कामासाठी २ कोटी ८० लक्ष रुपये निधी तर नाशिक,निफाड, येवला, वैजापूर औरंगाबाद या प्रमुख राज्य मार्ग २ या रस्त्यावर गोई नदीवरील सा.क्र.२०९/१०० मध्ये मोठ्या पुलाचे बांधकाम करण्यासाठी ७ कोटी ५० लक्ष रुपये निधीस मंजुरी देण्यात आलेली आहे. सदर कामांना लवकरच सुरवात होणार असून नागरिकांना दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध होणार आहे.