सुयश सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
येवला शहरातील नगर-मनमाड रोडवरील बनकर पेट्रोल पंपावर बुलेट गाडीत पेट्रोल भरण्यासाठी दोघे जण आले असता पेट्रोल भरल्यानंतर काही वेळा नंतर अचानक बुलेटने पेट घेतला. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली. रात्री बाराच्या सुमारास दोघा तरुणांनी बुलेट गाडीत पेट्रेल भरल्यानंतर काही वेळात शॉट सर्किट होऊन गाडीने पेट घेतल्याने दोघे जण घाबरुन तेथून दूर पळाले. मात्र त्याच वेळी शेजारील पेट्रोल पंपाचे कर्मचारी मदतीला धावून आले. त्यांनी आपल्या पेट्रेल पंपावरील ऑक्सीजन फायर बॉटल फोडत आग आटोक्यात आणल्याने पेट्रेल पंपावरील होणारा मोठा अनर्थ टळला. ही सर्व घटना पेट्रेाल पंपावरील सीसीटीव्ही मध्ये कैद झाली.