येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात उद्यापासून तीन दिवस पतंगउत्सवाला सुरुवात होत आहे. यंदा अनेकांनी आपल्या मागणी प्रमाणे पतंगावर आपल्या जाहिराती तसेच डिझाईन बनवून घेतल्या असल्या तरी प्रथमच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या छबीच्या पतंग येथील कारागिराने तयार केल्या आहे. अशा प्रकारची मागणी आल्याने त्या तयार करण्यात आल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. यापूर्वी केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या छबीच्या पतंग दिसल्या होत्या. मात्र यंदा प्रथमच एकनाथ शिंदे यांच्या छबीच्या पतंग आकाश भरारी घेतांना दिसणार आहे.