अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन तीन दिवसापासून जोरदार पाऊस होत असून या पावसामुळे बळी राजाची चिंता मिटलेली असली तरी पावसामुळे अनेक ठिकाणी शेती पाण्याखाली गेल्याने त्याच्या चिंतेत मात्र भर पडली आहे. आज दुपारी नंतर मनमाड, येवला तालुक्यातील पाटोदा परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतालगत असलेल्या ओढ्याना पाणी येऊन पाणी शेतात घुसल्याने पीक पाण्याखाली गेल्याचे चित्र पहावयास मिळाले. तर पाटोदा-लासलगाव रस्त्यावर पाणी आल्याने काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली होती.