येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने येवल्यातील पैठणी विणकर ओमकार दोडे या तरुण विणकराने शिवाजी महाराजांची पैठणीतील वॉल हॅंगिग या हस्तकला प्रकारात शिवरायांची प्रतिकृती साकारत त्यांची मोठी फ्रेम बनविली. या कलाकृतीला या विणकराला तीन महिन्याचा कालावधी लागली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक सोहळ्याला ३५० वर्ष पूर्ण झाल्याने आज त्याचे अनावरण करत आगळ्या वेगळ्या पध्दतीने महाराजांना अभिवादन केले. येथील पैठणी सातासमुद्रापार प्रसिध्द झालेली असून येथील पैठणी विणकर सतत पैठणीवर वेगवेगळी कला साकारत असतात.