अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
येवल्यातील भूषण मुदगल या पैठणी विणकर कारागिराने पैठणी शेल्यावर माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांची प्रतिमा साकारली आहे. या शेल्यावर संकटमोचक असे लिहले आहे. विणकामाकरता या कारागिराला पंधरा दिवसांचा कालावधी लागला असून भाजपा विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष समीर समदडीया हे लवकर हा शेला आमदार गिरीश महाजन यांना भेट देणार आहे.
पैठणी म्हटले की डोळ्यासमोर नाव येते ते म्हणजे येवला येथील पैठणीचे. येथे विणकर कारागीर आपली कला पैठणीच्या पदरावर सादर करत असतात. त्यामुळे येवल्याच्या पैठणीची ओळख ही देशातच नाही तर सातासमुद्र पार पोहचलेली आहे. येथील पैठणी विणकर केवळ पैठणीवर केवळ पारंपरिकच नाही तर अवघड अशा कलाकुसरीच्या वेगवेगळ्या पैठणी वर डिझाईन साकारत असतात, तर अनेक हौशी विणकर पैठणीच्या शेल्यावर धर्मिक, राजकीय ऐतिहासिक अशाच प्रतिमा साकारतात.