येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पैठणीच शहर अशी ओळख असलेल्या येवला तालूक्यातील नाशिक – औरंगाबाद महामार्गावरील खामगाव-पाटी येथिल कदम पैठणीच दुकान फोडत लाखो रुपयांच्या पैठणीवर चोरट्यांनी डल्ला मारला. चोरीची ही घटना सकाळच्या सुमारास उघडीस आली. अज्ञात चोरट्यांनी शोरुमच्या छताचे पत्रे उचकवून आत प्रवेश करत दुकानातील जवळपास पाच ते सहा लाखापेक्षा जास्त किमतीच्या पैठणी घेऊन पोबारा केल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. दिवाळी निमित्त शोरुम चालकाने नवीन पैठणीचा माल दुकानत भरलेला होता. दरम्यान तालूका पोलिसा पोलिस या घटनेचा अधिक तपास करीत आहे.









