येवला:– श्री महालक्ष्मी महिला ग्रुप आयोजित नागपंचमी सणानिमित्त महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन येथील स्वामी मुक्तानंद विद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले होते. या वेळी महिलांनी मोठया संख्येनी गर्दी केली होती व विविध स्पर्धांन मध्ये तरुणीनसह वयोवृध्द महिलांनी सहभाग घेतला होता.
महिलांच्या कला गुणांना वाव मिळावा म्हणून “चला नागपंचमीचा सण हसत खेळत साजरा करू या- वर्षातून एकदा पूर्वीचे दिवस आठवू या — आनंदी क्षण एकत्र साजरा करूया” या श्री महालक्ष्मी महिला ग्रुपच्या आव्हानाला प्रतिसाद देत, सायंकाळी पाच वाजता स्वामी मुक्तानंद विद्यालयाच्या प्रांगणात महिलांनी प्रचंड गर्दी केली होती. ग्रुपने खास महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. त्यात उखाणा स्पर्धा, चमचा लिंबू स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा, सदर स्पर्धा वयोगट २५ ते ५० वर्ष व ५० वर्ष वयाच्या पुढील वयोगटातील महिलांसाठी घेण्यात आली. स्पर्धेतील खेळांचा तरुणींस वयस्कर महिलांनी मनमुरादपणे आनंद लुटला. उखाणे स्पर्धेत प्रथम क्रमांक सुमन सोपे, व्दितीय क्रमांक अर्चना कुलकर्णी, तृतीय क्रमांक पद्मावती शिंदे यांनी मिळवला. तर चमचा लिंबू स्पर्धेत प्रथम पूनम पगारे, व्दितीय मीना लोणारे, तृतीय जोसना मुंगीकर यांना मिळाला. संगीत खुर्ची स्पर्धेत २५ ते ५० वर्ष वयोगटात प्रथम रेश्मा परदेशी, व्दितीय पूनम पगारे, तृतीय शिल्पा भावसार तर वयोगट ५० वर्षाच्या पुढील प्रथम संध्या निकम, व्दितीय जोसना मुंगीकर, तृतीय मनिषा शिनगर यांनी पटकावला. प्रथम क्रमांक विजयी स्पर्धकांना प्रविण फोटो स्टुडिओ यांचे कडून पैठणीसाडी भेट देण्यात आली. तर व्दितीय क्रमांकाच्या स्पर्धकांना ग्रुपतर्फे डिनर सेट व तृतीय क्रमांक विजेत्यांना लेडीज पर्स भेट देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष उषाताई शिंदे यांनी केले तर सूत्र संचालन माजी नगराध्यक्ष राजश्री पहिलवान यांनी केले. परीक्षक म्हणून गीतांजली राशनकर व रामेश्वरी शिंदे या होत्या, कार्यक्रम यशस्वीते साठी ग्रुपच्या सदस्या पद्ममा शिंदे, सुनिता येवले, अयोध्या शर्मा यांनी विशेष परिश्रम घेतले या वेळी अल्का जेजुरकर व हेमलता गायकवाड उपस्थित होत्या.