नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येवला तालुक्यातील अंदरसुल-सायगाव रोड लगत घोडके वस्तीवर अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करून १ लाख ५० हजार रुपये रोख सात तोळे सोने चोरून पोबारा केल्याची खळबळजनक घटना घडली आहे
अनिल घोडके व सुभाष घोडके यांच्या वस्तीवर चोरट्यांनी घरासमोरील दरवाज्यातून प्रवेश करत कपाटाचा लॉक तोडून त्यात ठेवलेले एक लाख ५० हजार रुपये रोख व सात तोळे सोने चोरून मागील दरवाजा तोडून चोरटे फरार झाले.
या घटनेमुळे परिसरात घाबरटीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी भुरट्या चोरांचा बंदोबस्त करावा व रात्रीचा पोलिसांची गस्त वाढवावी मागणी जोर धरू लागली आहे.