येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येवला शहराला परतीच्या पावसाने चांगलेच धुऊन काढले, मध्यरात्री झालेल्या जोरदार पावसाने शहरातील सखल भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने अनेक कुटुंबांची चांगलीच तारांबळ उडाली. या पावसाच्या पाण्यामुळे अनेक संसारपयोगी वस्तू पाण्याच्या खाली गेल्या. दिवाळी निमित्त अनेकांनी घराची आवरासावर करुन ठेवलेली असतांना जोरदार पावसामुळे घरात पाणी घुसले. तर शहरातील सर्वात मोठ्या शनीपटांगणावर सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने येथील व्यवसायिकांच्या दुकांनाना पाण्याच्या वेढा पडला. त्यामुळे जोपर्यंत पाण्याचा निचरा होत नाही तो पर्यंत व्यवसाय करणे मुश्किल होणार आहे.