येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्याचे भाग्यविधाते व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसा निमित्त येवला शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस व तुलसी आय हॉस्पिटल नासिक यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले २५० च्या वर नागरिकांनी नेत्रांची तपासणी करून घेतली.
सुरुवातीला धन्वंतरी मातेच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन भुजबळांचे स्वीयसहायक बाळासाहेब लोखंडे, डॉ.चंद्रशेखर क्षत्रिय, डॉ.अमृत पहिलवान, वसंत पवार, तुलसी आय केअरचे डॉ.नथु पाटील, डॉ.हर्षल पाठक, डॉ.कुलदीप भोसले, राष्ट्रवादी महिला अध्यक्षा राजश्री पहिलवान यांनी केले तर प्रमुख अतिथी म्हणून अर्जुन कोकाटे, सुभाष गांगुर्डे, शरद श्रीश्रीमाळ, सचिन सोनवणे,संदिप बोदरे आदी उपस्थित होते. मनोगत बाळासाहेब लोखंडे, डॉ.नथु पाटील, डॉ.क्षत्रिय, डॉ.अमृत पहिलवान यांनी व्यक्त केले.नेत्र तपासणी साठी मोठ्या प्रमाणात स्त्री पुरुषांनी गर्दी केली होती. २५० च्या वर नागरिकांच्या नेत्रांची तपासणी तुलसी आय केअर हॉस्पिटलचे डॉ.नथु पाटील व सहकारी डॉक्टरांनी केले.त्यात ३५ नागरिकांना मोतीबिंदू असल्याने शस्त्रक्रिया करण्यासाठी तुलसी आय हॉस्पिटल नासिक येथे पाठवण्यात आले, त्यांच्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे. ४० च्यावर नागरिकांना अल्प दरात चष्मे देण्यात आले तसेच लासुर २, तिरळे पणा २,पडद्याचे आजराचे १ असलेले रुग्णांची शस्त्रक्रिया व उपचार केले जाणार आहे.कार्यक्रम यशस्वीते साठी येवला शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा राजश्री पहिलवान, उपाध्यक्षा अल्का जेजुरकर, निता बिवाल, हेमलता गायकवाड, नर्गिस शेख, विमल शहा यांनी परिश्रम घेतले.