येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येवला शहरातील अमरधाम मधील महामृत्यूंजय मंदिरात कालाष्ट निमित्त काही भाविकांच्या वतीने होम करण्यात येत असतांना चक्क मंदीरात नागराज अवतरले आणि त्यांनी थेट मंदीरातील भगवान शंकराच्या मुर्तीवर त्यांच्या गळ्याला वेढा घालत ठाण मांडले. ही गोष्ट पुजेला बसलेल्यांच्या लक्षात येताच त्यांनी सर्प मित्राला तातडीने बोलविले. सर्पमित्राने बराच वेळ नागराजाला बाहेर काढण्याच्या प्रयत्न केल्यानंतर अखेर त्याला पकडण्यात येऊन दूर जंगलात सोडून देण्यात आले. मात्र ही गोष्ट समजताच अनेकांनी तेथे गर्दी केली होती.