सुयश सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
येवला शहरातील फत्तेबुरुज नाका भागातील जंगलीदास महाराज कमानीखाली असलेल्या गटारीचा ढापा हा गेल्या सहा महिन्यात चार वेळा फुटल्याने येवला नगरपालिकेचे गांधीगिरी पध्दतीने धन्यवाद मानण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन या गटारीच्या ढाप्या भोवती रांगोळी काढली. त्यानंतर हार फुलांनी सजवून उपरोधिक धन्यवाद मानले. तसेच अपघाताची वाट न पाहता पालिकेने उच्च दर्जाचे ढापे येथे बसवावे अशी मागणी या नागरिकांनी केली. याप्रसंगी समर्थ टाक, अतुल पगारे, सय्यद आयाज अली, अशोक सासे, गणेश पवार ,गणेश गाडे ,रवी गाडे ज्ञानेश्वर खैरमोडे ,अरुण गाडे ,सुधीर अहिरे, आदी पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते उपस्थित होते.