नाशिक(इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील येवला तालुक्यातील कुसुर गावात पोळ्याच्या सणाच्या दिवशीच दुर्देवी घटना घडली आहे. गावातील ३२ वर्षीय तरुण शेतकरी आपल्या बैलांना घेऊन गावा लगत असलेल्या बंधाऱ्यावर गेला असता बैल धुण्याच्या नादात तो आत शिरल्याने त्याचा बुडून दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना गावात समजताच गावकरी बंधाऱ्याजवळ जमा झाले पोहणाऱ्यांनी त्याचा शोध घेत त्याचा मृतदेह बाहेर काढला. सध्या जिल्ह्यात अनेक ठिकाणी चांगला पाऊस झालेला असल्याने नदी, बंधारे भरलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बैल धुवायला जाताना काठावरच त्यांना धुवावे असे आवाहन करण्यात आले आहे.