अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
येवला तालुक्यातील बाळापूर (कसारखेडा) येथील प्राथमिक शाळेत तर्फे अमृतमोहत्सवी वर्षाचे औचित्य साधत शाळेच्या प्रांगणात प्रार्थनेच्या वेळी तिरंगा हातात घेतलेल्या विद्यार्थ्यांनी ७५ वर्ष झाल्याची प्रतीकृती तयार केली. देशाला स्वातंत्र्यांला ७५ वर्ष होत असल्याने सर्वत्र अमृतमहोत्सव साजरा होत आहे. त्यामुळे यंदा हर घर तिरंगा हा उपक्रम सुद्धा राबविण्यात येत आहे.