अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
येवला तालुक्यातील अंदरसुल येथे काल मध्यरात्रीच्या सुमारास सात ते आठ चोरट्यांनी येवला वैजापूर रोडवरील जागीरदार मळ्यात तसेच भारम रोड येथील सोनवणे वस्तीवर जाऊन दरवाजे तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. स्थानिक रहिवाशांनी प्रतिकार केल्यामुळे चोरांना पळ काढावा लागला. योगेश जागीरदार यांच्या वस्तीवर सुमारे एक तास चोरट्यांनी धुमाकूळ घालत घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यात चांदीचे कॉइन काही सोन्याची दागिने असा सुमारे पन्नास हजार रुपये पर्यंतच्या मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले असून रात्रीच्या वेळेस पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.