अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
येवला शहरातील गायकवाड मळा परिसरातून सुधाकर लक्ष्मण गायकवाड (५१) हे १७ जुलै दुपारपासून राहत्या घरापासून बेपत्ता झाले होते. आज त्यांचा मृतदेह वॉटर सप्लाय जवळ मिळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. येवला शहर पोलिसात यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान पाचव्या दिवशी शोध मोहीम सुरू असताना त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. हा घातपात आहे की आत्महत्या हे अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल. येवला शहर पोलीस व त्यांचे नातेवाईक रात्रंदिवस गायकवाड यांचा शोध घेत असताना पोलिसांनी तपास करून मोबाईल लोकेशनचा आधार घेतला. त्यानंतर गायकवाड यांचे शेवटचे लोकेशन वॉटर सप्लाय गेट समोर आढळून आले होते. घटनेची माहिती समजताच पोलिस निरीक्षक भगवान मथुरे, पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे, आणि त्यांच्या सहकार्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे.