प्रशांत कळंके, येवला
येवला तालुक्यातील हडप सावरगाव येथील जयश्री पवार ही आदिवासी समाजातील पहिली महिला डॉक्टर झाली असून तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. शासकीय विश्रामगृह येथे म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी ढवळे म्हणाले की, जयश्री पवार ही आपल्या एकलव्य आदिवासी समाजासाठी भूषणावह बाब आहे. हडप सावरगाव सारख्या छोट्याशा खेडेगावातील जयश्री हिने प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत जिद्दीने आपले शिक्षण पूर्ण केले. त्यामुळे ती तालुक्यातील पाहिली महिला डॉक्टर झाली आहे. तीची प्रेरणा घेऊन आपल्या आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण केले पाहिजे शिक्षण घेतल्याने आदिवासी समाजाचा विकास होईल असे त्यांनी सांगितले. यावेळी एकलव्य संघटनेचे येवला तालुक्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.