येवला – तालुक्यातील राहाडी भारम रस्त्यावरील बस स्टॉप येथे भारम येथील वाल्मीक दिलीप गांजे (वय २९) याच्या ताब्यात एक गावठी पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे आणि एक रिकामी पुंगळी सह सॅमसंग कंपनीचा मोबाईल असा एकूण ३५ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त पोलिसांनी केला आहे. गाजी याची झाडाझडती घेतली असता हा मुद्देमाल त्याच्या ताब्यातून मिळाला. नाशिक स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली.
नाशिक स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार उदय पाठक,प्रवीण सानप, पोलीस नाईक प्रशांत पाटील विश्वनाथ काकड आदींनी या कारवाईत सहभाग घेतला होता. या आरोपीला पुढील कारवाईसाठी येवला तालुका पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.