अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधी यांना ईडीची नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलवत मोदी सरकारने दडपशाही सुरू केली असून देशात सर्वसामान्यांच्या प्रश्नावर लढणाऱ्या पक्षाला केंद्रीय यंत्रणेचा वापर करून त्रास देण्याचे काम मोदी सरकार करत असल्याचे सांगत येवला शहर युवक काँग्रेस तर्फे विंचूर चौफुली येथे घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.