नाशिक – राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून जलजीवन मिशन अंतर्गत ३८ गाव प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेच्या पंपिंग मशिनरी व इतर कामांसाठी रेट्रोफिटिंग योजनेतून प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असून या योजनेसाठी १० कोटी ९ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला तालुक्यातील अडतीस गावांसाठी नळ पाणी पुरवठा योजना सुरु आहे. सदर पाणी पुरवठा योजना केवळ राज्यात नव्हे तर देशात गौरविली गेलेली पाणी पुरवठा योजना आहे. ही पुरवठा योजना सन २००८ मध्ये कार्यान्विंत झाली असून आता ती कालबाहय होत आली आहे. सद्यस्थितीमध्ये या योजनेतील पंपीग मशिनरीची दुरुस्ती करुनही वारंवार बिघाड होत असल्याने योजनेतील समाविष्ठ गावांना पाणी पुरवठा करतांना अडचणींना सामारे जावे लागत होते. योजनेतील प्रत्येक झोन मधील पाणी उपसा पर्यायी संयंत्रे अकार्यक्षम झाल्यामुळे सदर विदयुत यांत्रिकी उपकरणे नवीन बसविण्याची आवश्यकता होती. त्यामुळे पंपींग संयंत्र, समाविष्ठ गावांसाठी आवश्यक वितरण व्यवस्था व साठवण टाक्या बांधणे हे काम जलजीवन मिशनमधील रेट्रोफिटींग या योजनेतून घेण्याबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी सूचना दिलेल्या होत्या. त्यानुसार या योजनेचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला होता. या योजनेस आज शासनाकडून या योजनेस प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. सदर योजनेसाठी सौर ऊर्जा प्रकल्प बसविण्याचे काम अंतिम टप्यात असल्याने या योजनेच्या विजेचा प्रश्न देखील कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे. ही योजना यशस्वीरित्या राबविली जात असल्याने राज्यातील सर्व प्रादेशिक योजनांसाठी पथदर्शी अशी ही योजना आहे.
या योजनेत धानोरे, धुळगांव, पिपंळगांव लेप, शिरसगांव लौकी, एरंडगाव खु, एरंडगाव बु, नेऊरगांव, जळगांव नेऊर, मानोरी बु, देशमाने बु, नगरसुल, भारम, न्याहारखेडे बु,सायगांव, न्याहारखेडे खु, पिंपळखुटे बु, भायखेडा, सुरेगांव रस्ता, अंदरसुल, गवंडगांव, उंदिरवाडी, पिंपळगांव जलाल, नांदेसर, आडगांव चोथवा, बाभुळगांव खु, बाभुळगांव बु, अंगणगांव, निमगांव मढ, साताळी, कुसुर, अनकुटे, धामोडे, सावरगांव, विखरणी, विसापुर, कातरणी, सोमठाणदेश, पिंपळखुटे खु, तळवाडे, देवरगांव, अंतरवेली, सातारे, मुरमी, गोपाळवाडी सावरगांव, चिंचोडी बु, चिंचोडी खु, अंतरवेली, अंगुलगांव, निळखेडा, आडगांव रेपाळ, बाळापुर, अनकाई, गोरखनगर, गुजरखेडा व काही शैक्षणिक संस्था समावेश होतो. सुरुवातीच्या काळात अडतीस गावांची तहान भागविणारी ही योजना ५३ गावे व इतर १० संस्थाना यशस्वीरित्या पाणी पुरवीत आहेत.