अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
देहू येथील संत तुकाराम महाराज यांच्या शिळा कार्यक्रमा नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भाषण करण्यासाठी दिल्लीतील पंतप्रधान कार्यालयाने अनुमती नाकारल्याने त्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले आहे. नाशिक जिल्हयातही पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या येवला विधान सभा मतदार संघात राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी माजी नगराध्यक्षा राजश्री पहिलवान यांच्या नेतृत्वाखाली विंचूर चौफुली येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ निदर्शने करीत निषेध व्यक्त केला.