अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
येवला तालुक्यात शेकडोच्या संख्येने हरणांचे कळप सर्वत्र बागडत असतात, अद्याप म्हणावा तसा पाऊस नाही त्यामुळे पाण्याच्या शोधात हरीण भटकत असतात,अंदारसुल येथे पाण्याच्या शोधत फिरत असलेल्या हरणावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याने हरीण जखमी झाले,जवळच असलेल्या तरुणांच्या लक्षात येताच त्यांनी कुत्र्यांच्या तावडीतून हरणाची सुटका केली,जखमी हरणाला उपचारासाठी तातडीने वनविभागाच्या हवाली करण्यात आले.