अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
सॉफ्टवेअर व्दारे आडनावानुसार सदोष पध्दतीने माहिती संकलित करुन ओबीसी समाजाची फसवणूक होत असल्याने त्यामुळे समाजाचे कायमचे भरुन न येणारे नुकसान असल्याने समर्पित आयोगाव्दारे होणारे चुकीचे काम थांबवून ते तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका यांच्या मार्फत गोळा करुन सर्वोच्च न्यायलयात ठेवण्यात यावे या मागणीसाठी आज येवला येथे तहसिल कार्यालयावर समता परिषदेतर्फे निर्देशने करण्यात येऊन तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. ओबीसींची माहिती संकलित करण्यासाठी मा.बंठिया यांच्या अध्यक्षतेखाली समर्पित आयोग गठित केला. सदर आयोगाने माननिय सर्वोच्च न्यायालयास अपेक्षित असलेला इम्पेरिकल डाटा दारोदार जाऊन ओबीसींची खरी आर्थिक,सामाजिक,राजकीय स्थितीची माहिती संकलित होणे अपेक्षित होती. मात्र वस्तू स्थितीची माहिती गोळा न करता सॉफ्टवेअर व्दारे ती केली जात असल्यामुळे हे आंदोलन करण्यात आले.