अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
शरद पवार हे राष्ट्रपती झाले तर आनंदाची गोष्ट असून महाराष्ट्राकरिता गर्वाची बाब राहील असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देतांना सांगितले. येवला येथे कार्यक्रमासाठी आले असता पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी राष्ट्रपती पदाकरिता उमेदवार म्हणून शरद पवार यांच्या नावाची चर्चा असल्याची सांगितले. यावर बोलतांना भुजबळांनी सांगितले की, ममता बॅनर्जी यांनी जेवढे ही विरोधी पक्षाचे मुख्यमंत्री आहे. तसेच विरोधी पार्टीचे अध्यक्ष नेता आहे. त्यांना आमंत्रित करून त्यांच्या सोबत मीटिंग घेऊन राष्ट्रपतीपदा करता कोणाला उभे केले जावे या गोष्टी ममता बॅनर्जी बघत आहे. याबाबत सगळ्याच विरोधीपक्ष नेत्यांशी विचार विनिमय करत आहे. याबाबत पवार साहेबांनी हा म्हटले की नाही याबाबत मला काही माहीत नाही. महाराष्ट्रातून शरद पवार साहेब हे एवढ्या मोठ्या पदावर गेल्यास नक्कीच आनंदाची व गर्वाची गोष्ट महाराष्ट्र करता राहील असे छगन भुजबळ म्हणाले.