अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
येवला तालुक्यासह महाराष्ट्रात चांगल्या प्रकारे पाऊस पडावा तसेच पिके पाणी चांगल्या मुबलक प्रमाणात यावे याकरता येवला तालुक्यातील सावरगाव येथील गुरुदेव दत्त विश्वस्त संस्था यांच्या वतीने दरवर्षी भव्य पर्जन्य दत्तयाग आयोजन करण्यात येत असते. मात्र कोरोनामुळे दोन वर्ष हा याग होऊ शकला नाही. कोरोना मुक्ती नंतर हा पर्जन्य दत्तयाग होत असल्याने अनेक भाविकांनी या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी केली होती. तीन दिवस चालणाऱ्या या भव्य दत्तयागास ७५१ जोडपे पूजेस बसले असून या यागा करता संपूर्ण भारतातून भावीक आले आहे. दोन वर्षाच्या कोरोनाचा कालखंडात नंतर दत्त यागाचे आयोजन करण्यात आले होते. उद्या या योगाचा पूर्णाहुती सोहळा होणार असून त्यासाठी अनेक मान्यवर येथे दर्शनासाठी येणार आहे.