अजय सोनवणे, मनमाड
येवला तालूक्यात हरणांची आणि काळविटांची मोठी संख्या असून सध्या पाण्याच्या शोधात हरणांचे कळप सर्वत्र फिरत असतात. सकाळच्या सुमारास कळपात असलेले काळविट भटकले आणि ते कठडा नसलेल्या विहिरीत पडले. शेतकरी कचरु पोपट आगवण यांच्या विहिरीत हे काळविट पडल्याच निर्दशनात येताच वनविभागाला याची माहिती देण्यात आली. वन्यजीव प्रेमी प्रविण आहेर यांना ही माहिती समजताच त्यांनी सहका-यांच्या मदतीने विहिरीत दोर टाकून त्या काळविटाला अलगद वर काढले. काळविटाला वर काढताच त्याला सोडण्यात येताच त्याने पुन्हा जंगलात धूम ठोकली.