अजय सोनवणे, येवला
येवला – कांद्याच्या दरात सातत्याने होणा-या घसरणीमुळे शेतकरी त्रस्त असतांना प्रहार शेतकरी संघटनेतर्फे कांद्याच्या माळा घालून येवला तहसिलदारांना निवेदन देण्यात आले आहे. कांद्याला योग्य दर मिळावा तसेच राज्य सरकारने कांद्याला अनुदान द्यावे या मागणी साठी आज जिल्हयातील अनेक ठिकाणी प्रहार संघटने तर्फे तहसिल कार्यालवर मागण्यांचे निवेदन देण्यात आले. पण, येवला तहसिल कार्यालयात प्रहारच्या कार्यकर्त्यांनी कांद्याच्या माळा गळ्यात घालून तहसिलदारांना निवेदन दिले. यापुढे जर सरकारने दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रहार शेतकरी संघटनेचे येवला तालूका प्रमुख हरिभाऊ महाजन यांनी दिला आहे.
नाशिक जिल्हा हा कांदा उत्पादनात अग्रेसर असूननगदी पिक म्हणून शेतकरी कांद्याची लागवड करीत असतात.यंदाच्या हंगामात जिल्हयात सर्वत्र उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड झाली. मात्र हा कांदा जारात येताच सुरुवातीच्या काही दिवसांनंतर सातत्याने कांद्याचे दर घसरु लागले शेतक-याला दोन पैसे मिळावे यासाठी केंद्र सरकारच्या नाफेड मार्फत कांदा खरेदी सुरु झाली. मात्र तेथेही भाव फारसा मिळत नसल्याने कांद्याला योग्य दर मिळावा यासाठी आता ठिकठिकाणी आंदोलन होत आहे.