अजय सोनवणे, येवला
सध्या सर्वत्र लग्नसराईची धामधूम चालू असतानाच अशाच प्रकारे येवल्यात एक अनोखा विवाह सोहळा संपन्न झाला असून लहानपणापासूनच वर-वधू हे कर्णबधिर असल्याने यांचा विवाह त्यांच्या कुटुंबाने मोठ्या थाटामाटात संपन्न केला असून यावेळी या नवदांपत्याची रथामध्ये मिरवणूक काढून विधिवत असे लग्न लावून देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने वऱ्हाडी मंडळी,सामाजिक कार्यकर्ते देखील या विवाह सोहळ्यास उपस्थित होते.