अजय सोनवणे, येवला
येवला म्हंटले की डोळ्या समोर येथे ती म्हणजे पैठणी.केवळ देशातच नाही तर सातासमुद्रापार येवला शहराचे नाव झालय ते पैठणी मुळे.. येवल्यात पारंपरिक पैठणी तयार तर होतेच मात्र गेल्या काही वर्ष पासून येवल्याचे पैठणी कारागीर नेहमीच आपली कला पैठणी साडीवर वेगवेगळ्या पद्धतीने साकारत आहे, रोहित पैंजणे व प्रशांत पैंजणे या दोघा विणकर भावंडांनी पैठणी साडीवर शनिवार वाडा, प्रतापगड, असे गड-किल्ले साकारले असून या करता या कारगिराला पाच ते सहा महिन्याचा कालावधी लागला आहे. या भावंड नेहमीच विविध कला पैठणी साडीवर साकारत असतात. मात्र आपला इतिहास नागरिकांनी जपावा याकरता या भावंडांनी इतिहासा संदर्भात गड किल्ले पैठणी साडीवर विणकाम करून काढले असून यापुढे देखील विविध कला पैठणीवर साकारणार असल्याची माहिती या पैठणी विणकरांनी दिली आहे.