येवला – मेंढ्या चारता असताना मोबाईल पाहण्याच्या नादात शेजारील कठडे नसलेली विहिरी लक्षात न आल्याने मेंढपाळाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. येवला तालुक्यातील साताळी येथे पिंपरी लोणी येथून मेंढ्या चारण्यासाठी घेऊन आलेले मेंढपाळ सोमनाथ त्रांबक गोरडे वय ४२ हे मृत मेंढपाळाचे नाव आहे. साताळी परीसरात याबाबत तालुका पोलिसांना माहिती कळताच तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस हवालदार मधुकर उमरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय येथे पाठवला आहे. या घटनेचा पुढील तपास येवला तालुका पोलिस करत आहेत.








