अजय सोनवणे, येवला
येवला – तालुक्यातील तांदुळवाडी फाटा येथे नगर- मनमाड राष्ट्रीय महामार्गवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने ७ जणांना जबर जखमी केल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली आहे. सुरुवातीला या सर्व जखमी नागरिकांना जवळच्या सावरगाव येथील प्राथमिक दवाखान्यात दाखल करण्यात आले, नंतर त्यांना येवला येथील उपजिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले.
संदीप जयचंद कासलीवाल, संपत रंगनाथ गोरे, पुष्पा सुदम गोरे, धनजय नानासाहेब गोरे, दीपक अप्पासाहेब कोल्हे, मंगलबाई बाळासाहेब हिंगे, गणेश पुराणिक, अशी जखमीची नावे असून येवला येथील उपजिल्हा रुग्णालयात डॉ. गौरव जोशी यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहे. दरम्यान, आणखी याच ठिकाणी भूषण तळेकर या व्यक्तीला हेच कुत्र चावल्याची माहिती समोर आली आहे.