येवला – विजे अभावी कांदा पिकाला पाणी देणे शक्य होत नसल्याने संतप्त होत येवला तालुक्यातील मातुलठाण येथील श्रीराम आव्हाड या शेतकऱ्याने आपल्या दोन एकर कांदा पिकावर नांगर फिरवला आहे. या शेतकऱ्याने मोठ्या कष्टाने कांदा पीक घेतले होते. सुरुवातीला दोन महिने कांदा पिकाला पाणी देता आले होते मात्र त्यानंतर लाईट जाणे, रोहित्र खराब होणे, यामुळे पाणी असून देखील कांद्याला पाणी देणे होत नव्हते. त्यातच उन्हाचा तडाखा यामुळे पूर्णपणे कांदा पिकाची वाढ न झाल्याने झालेला खर्च देखील निघणे मुश्कील झाल्याने संतप्त होत या शेतकऱ्याने कांदा पिकावर नांगर फिरवला.