नाशिक – येवला तालुक्यातील धुळगाव-पाटोदा रस्त्यावर बुलेट व स्विफ्ट कार यांच्यात समोरासमोर अपघात झाला. या अपघातात बुलेटस्वरांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अमोल अशोक बागुल असे मृत्यू झालेल्या २३ वर्षीय बुलेटस्वार तरुणाचे नाव आहे. तो चांदवड तालुक्यातील हिरापूर येथील रहिवाशी आहे. या अपघाताचे वृत्त समजताच नातेवाईकांनी येवल्याच्या उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली.